आता घोंघावतेय् बर्ड फ्लूचे संकट!

    दिनांक :13-Jan-2021
|
अग्रलेख... 
संकटं माणसाची साथ कधीच सोडत नाहीत, असे म्हणतात. ते खरेही आहे. व्यक्ती qकवा एखादा देश खूप महान आहे म्हणून त्या व्यक्तीवर अथवा त्या देशावर संकटेच येणार नाहीत असे नाही. उलट, व्यक्ती जितकी मोठी, देश जितका मोठा तितकी संकटेही मोठी, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. जोवर ही पृथ्वी आणि त्यावरील मानवजात, जीवसृष्टी, झाडे, पशू-पक्षी अस्तित्वात आहेत, तोवर संकटं ही येणारच. सुखामागून जशी दुःखं मानवी जीवनाचा पाठलाग करतात, तशीच संकटेदेखील माणसाचा पिच्छा पुरवीत असतात. फरक फक्त एवढा की, कधी ती लहानशी असतात, तर कधी महाभयंकर. कोरोना महामारीचे संकट असेच वडवानलासारखे होते. एका फटक्यात त्याने या जगाला आपल्या कवेत घेतले.
 
a_1  H x W: 0 x
 
चीननिर्मित कोरोना विषाणू आढळल्याच्या महिनाभरात तो जगातील १९४ देशांत पोहोचला. त्याचा कहर आपण सारे बघतच आहोत. कधी कल्पनाही केली नसेल इतके भय या अदृश्य विषाणूने निर्माण केले. या संकटाशी साèया मानवजातीने निकराचा लढा दिला. आता तर या आजाराला पळवून लावू शकणाèया लसी बाजारात येत आहेत. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्यावर येत्या काही दिवसांत आपण विजय मिळवू, अशी स्थिती आहे. पण, हे संकट संपत नाही तोच बर्ड फ्लू नामक आजाराने तोंड वर काढले असून, तो आपल्या करामती दाखवू लागला आहे. वटवाघळे आणि कोंबड्यांच्या मांसामुळे कोरोना पसरतो, अशी अफवा पसरल्याने गेल्याच वर्षी लोकांनी कोंबड्यांचेच नव्हे, तर बकèयाचे मांस खाणेही बंद केले होते.
 
लोकांच्या या कृतीमुळे हे दोन्ही व्यवसाय कोलमडले आणि त्यात अनेकांचे रोजगार गेले. तशीच परिस्थिती बर्ड फ्लूमुळे पुन्हा उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात बर्ड फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर राजधानी दिल्लीतही बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. दिल्लीच्या पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार, भोपाळ येथे चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आठ नमुने सकारात्मक आढळून आले. महाराष्ट्र आणि दिल्लीसह, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेशात या रोगाने शिरकाव केला आहे. या रोगाने कोंबड्या, बदके, पोपट, कावळे आदी पक्षी समूहाने मरण पावतात. या विषाणूंचा शिरकाव मानवी शरीरात होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. बर्ड फ्लूच्या विषाणूंमुळे कोंबड्या आणि इतर पक्ष्यांना सर्दी होते आणि त्यांचा श्वास कोंडून मृत्यू होतो. या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मृत पक्ष्यांना थेट मातीत गाडून टाकले जाते.
सरकार सजग असले, तर कुठल्याही मानवनिर्मित म्हणा अथवा नैसर्गिक संकटावर मात करणे सहजशक्य होते. आज मोठ्या शहरांमध्येच पोहोचलेला बर्ड फ्लू लहान गावांमध्ये कधी प्रवेश करेल हे सांगता येणे अशक्य आहे. त्यामुळे या संकटाची दखल केंद्रानेही घेतली. प्रारंभी, या रोगाचे संक्रमण केवळ सात राज्यांपुरते होते. मात्र, या विषाणूंनी आता आणखी काही राज्यांमध्ये शिरकाव केलेला आहे. या पृष्ठभूमीवर संसदीय समितीची महत्त्वाची बैठक काल पार पडली आणि या संदर्भात उपाययोजना करण्याचा अहवाल केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या संकटाशी झुंज सुरूच असताना बर्ड फ्लूच्या रूपात आणखी एक संकट घोंघावू लागल्याने पंतप्रधानांच्या qचतेत भर पडली आहे. पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे वेळेत जागे होऊन टाळेबंदीसारखे कठोर निर्णय घेतले, त्यामुळे आपल्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात राहिली. मृत्यूही कमी झाले आणि साथरोगातून बाहेर पडण्याचा मार्गही दिसू लागला.
 
मुखाच्छादन, भौतिक दूरता, निर्जंतुकीकरण, स्वच्छतेबाबतचे नियम आणि खानपानाबद्दल सजग राहण्याची पंचसूत्री भारतीयांना या संकटातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरली. आता त्याच धर्तीवर बर्ड फ्लूसोबत लढा देण्यासाठी भारताला सज्ज व्हावे लागणार आहे. पंतप्रधानांनी या रोगाशी लढण्याचीही योजना आखली असून, जिल्हास्थानावरच या विषाणूंवर नियंत्रण मिळविण्यासाठी लढा देण्याचे आदेश जारी केले आहेत.
 
बर्ड फ्लूच्या चाचणीसाठी ज्या प्रयोगशाळा आहेत, तेथे नमुने तातडीने पाठविण्यास प्रशासनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. स्थानिक प्रशासन जेवढ्या गतीने पावले उचलेल, तेवढ्या वेगात या नमुन्याचे अहवाल प्राप्त होऊन पुढील कार्यवाही करणे सोपे होणार आहे. वन विभाग, स्वास्थ्य विभाग, पशुपालन विभाग यांच्यात समन्वय राखला जाण्याचीही गरज आहे. जेवढा समन्वय व्यवस्थित राहील तेवढ्या वेगाने उपाययोजना करणे शक्य होईल.
 
कोरोनामुळे आधीच देशाच्या आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यात या नव्या संकटाने आरोग्ययंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनानेच नव्हे, तर नागरिकांनीही स्वतःची स्वतःच काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या परिसरातील प्राणिसंग्रहालये, तलाव, पशू आणि पक्षिपालन केंद्रे, विशेषतः कुक्कुटपालन केंद्रांवर निगराणी ठेवावी लागणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई शहरात तीन कावळे, ठाण्यात १५ बगळे, दापोलीत सहा कावळे, बीडमध्ये ११ कावळे मृतावस्थेत आढळले असून, पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
 
परभणीत १०० कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. यामुळे एका कुक्कुटपालन केंद्रातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. बर्ड फ्लूची भारतातील पहिली नोंद राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये झाली. राजस्थानात आजपर्यंत तीन हजारांच्या आसपास पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यात कावळे, कोंबड्या, कबुतर, मोर आदींचा समावेश आहे. सुमारे १५ राज्यांमध्ये या रोगाने शिरकाव केल्याने देशभरातील प्राणिसंग्रहालयांच्या व्यवस्थापनांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाèयांनी मांस उत्पादक आणि विक्रेत्यांना सावध केले असून, या रोगाचे संक्रमण टाळण्यासाठी अंडी योग्यप्रकारे उकळून खाण्याचे निर्देश दिलेले आहेत.
 
महाराष्ट्राच्या शेजारच्या आंध्रप्रदेशात आणि तेलंगणामध्ये कक्कुटपालनाचा व्यवसाय मोठा आहे. अनेकांचे पोट याच व्यवसायावर आहे. तेथील व्यवसाय बुडणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोंबड्यांच्या मांसात अथवा अंड्यांमध्ये कुठे विषाणूंचा शिरकाव झाला, तर तो मानवी शरीरात केव्हाही प्रवेश करू शकण्याची स्थिती आहे. त्यावरही डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणे क्रमप्राप्त आहे.
 
अनेक शेतकरी शेतीला पूरक म्हणून कुक्कुटपालन करतात. त्यांना यापासून चांगली कमाई होते. कोंबड्यांची अंडी आणि मांसविक्री यातून त्यांचा उदरनिर्वाह होतो. पण, बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे त्यांच्या या पूरक व्यवसायाला फटका बसला आहे. काही राज्यांनी तर कोंबड्यांच्या मांसाच्या विक्रीवरच बंद घातली आहे. असे असले तरी शेतकèयांनी आणि या व्यवसायातील उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनासारख्या महामारीतून आपण सहीसलामत बाहेर आलो आहोत. कोरोनाचे संकट आपल्या देशाने बरेच आधी ओळखले.
 
त्यावर उपाययोजना केल्या आणि काय आश्चर्य! भारतातील बाधितांची संख्या तर कमी राहिलीच, शिवाय आपल्या देशातील मृत्युदरही इतर देशांच्या तुलनेत कमी राहिला. कोरोनाची लस शोधून काढण्यासाठी जगभरातील औषध कंपन्या प्रयत्नरत होत्या, संशोधने सुरू होती, शास्त्रज्ञ त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. यात भारतानेही आपले योगदान दिले आणि दोन लसी बाजारात आणल्या. केंद्र सरकारने या कंपन्यांच्या लसीकरणाला मंजुरीही दिली आणि आज अशी स्थिती आहे की, भारतीय लसींना जगभरातून मागणी येत आहे. कुठल्या संकटाला भारत कसे तोंड देतो, याकडे आज जगाचे डोळे लागून राहिले आहेत. कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना गळती लागली असताना, आपल्या देशात याच काळात प्रचंड मोठी विदेशी गुंतवणूक आली. आपल्या कंपन्यांनी भरपूर नफा कमावला. इतरांच्या तुलनेत आपल्याकडील बेरोजगारीचा दरही वाढला नाही. या साèया संकटावर भारत, भारताचे प्रशासन आणि शासन यांनी एकत्रित रीत्या कशी मात केली, हे साèया जगाला कळले आहे. या पृष्ठभूमीवर बर्ड फ्लूवरही मात करून भारताने जगाला दिशा दाखवावी, ही अपेक्षा!