आदर्श शिक्षक पुरस्काराची नावे निश्चित

    दिनांक :13-Jan-2021
|
आता कार्यक्रम होणार केव्हा?
तभा वृत्तसेवा
अमरावती,
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात आलेल्या 15 शिक्षकांच्या यादीला विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी 11 जानेवारी रोजी मंजूरी दिली आहे. त्यात 14 प्राथमिक शिक्षक विभागाच्या शिक्षकांचा समावेश असून एक शिक्षक माध्यमिक विभागाचा आहे.
 
 
a_1  H x W: 0 x
 
आता कार्यक्रमाच्या आयोजनाकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जिल्हा गौरव शिक्षण पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे 15 शिक्षकांची यादी 24 डिसेंबर रोजी पाठविण्यात आली होती. जिल्हा निवड समितीकडून 2019-20 पुरस्कारासाठी जी यादी पाठविली त्याला विभागीय आयुक्तांची मंजुरी दिली आहे. पुरस्कारासाठी 15 शिक्षकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आयुक्तांच्या स्तरावर सदर फॉर्ममध्ये त्रुटी काढण्यात आल्या होत्या. तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 5 सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम त्यावेळी होऊ शकला नाही. अखेर 15 शिक्षकांच्या नावाला विभागीय आयुक्तांकडून 11 जानेवारी रोजी मंजूरी देण्यात आली. आता सदर कार्यक्रम 26 जानेवारीला गणराज्य दिनी घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
 
//पुरस्कार प्राप्त शिक्षक
प्राथमिक गटातून बबलु कराडे(अचलपूर), शहाजहॉ परवीन मो. याकुब (अमरावती), वैशाली सरोदे (अंजनगाव सुर्जी), लखन जाधव (भातकुली), मंगेश वाघमारे (चांदुर बाजार), मनोज वानखडे (चांदुर रेल्वे), वैजनाथ इप्पर (चिखलदरा), उमेश आडे (धामणगाव रेल्वे), किशोर बुरघाटे (दर्यापूर), योगिता भुमर (धारणी), प्रियंका काळे (मोर्शी), अहमद खान पटेल (नांदगाव खंडेश्वर), सचिन विटाळकर (तिवसा), नंदकीशोर पाटील (वरुड) आणि माध्यमिक गटातून किशोर इंगळे (अमरावती) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.