सैफ अली खानच्या मालिकेवरून ‘तांडव'

    दिनांक :18-Jan-2021
|
- केंद्रसरकारकडून कारवाईची शक्यता
-उत्तरप्रदेशात गुन्हा दाखल
नवी दिल्ली,
सैफ अली खान आणि qडपल कपाडियासह विविध कलावंतांचा समावेश असलेल्या वेब मालिकेत आक्षेपार्ह दृश्ये असल्याने या मालिकेविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतली असून, सैफच्या मालिकेवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
tandav_1  H x W
 
तांडव वेब मालिकेवरून वाद उफाळल्याने माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज सोमवारी बैठक घेतली. ओव्हर द टॉफ अर्थात् ओटीटी मंचावर प्रसारित होणारे चित्रपट किंवा मालिकांसाठी नियामक संहिता तयार करावी, असे मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ओटीटी मंचाने याबाबत संहिता तयार न केल्यास केंद्र सरकार ती तयार करेल, असा इशाराही देण्यात आला. अभिव्यक्तिस्वातंत्र्यासोबत काही जबाबदाऱ्या देखील असतात. सृजन स्वातंत्र्याच्या नावावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
या मालिकेच्या विरोधात मुंबईतील भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केल्यावर मध्यप्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून तांडव मालिकेवर बंदी घालून ओटीटी मंचासाठी कठोर कायदे तयार करण्याची मागणी केली आहे. ओटीटी मंचावरून प्रसारित होणारे चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक, अश्लील दृश्ये प्रसारित केले जातात. केवळ इतकेच नव्हे, तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने qहदूंच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावल्या जात आहेत. अलिकडेच अ‍ॅमेझॉन व्हिडीओ प्राईमवर आलेल्या तांडव वेब मालिकेत निर्मात्याने जाणीवपूर्वक देवतांची थट्टा केली. ही मालिका दलितविरोधी तसेच qहदूंच्या विरोधातील आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
 
मालिकेवर बंदी घाला : खा. मनोज कोटक
मुंबईतील भाजपा खासदार मनोज कोटक यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तांडव वेब मालिकेच्या विरोधात तक्रार केली असून, या मालिकेवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. हा मंच सध्या सेन्सॉरमुक्त असल्याने बरेचदा निर्माते याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे आता ओटीटीवर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. तांडव मालिकेत देवता आणि qहदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी ओटीटीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा स्थापित करा, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी रविवारी दुपारी घाटकोपर पोलिस ठाण्यात तांडवच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
लखनौमध्ये गुन्हा दाखल
लखनौमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात अ‍ॅमेझॉन प्राईमच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, तांडव मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास, निर्माता हिमांशू कृष्ण मेहर आणि पटकथाकार गौरव सोलंकीच्या विरोधात १५३ (ए), २९५, ५०५ (१) (बी), ५०५ (२), ३६९, ६६, ६६ (एफ), ६७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
 
निर्मात्यांनी अखेर मागितली माफी
तांडव वेब मालिकेच्या निर्मात्यांनी अखेर आज सोमवारी बिनशर्त माफी मागितली आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने माफी मागत असल्याचे या मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितले.
 
माफी मान्य नाही
तांडव मालिकेचा दिग्दर्शक अली अब्बास जाणीवपूर्वक qहदूंच्या धार्मिक भावना दुखवतो. यापूर्वीही त्याने असेच प्रकार केले आहेत. अली अब्बासने आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्याचे मान्य केले नाही. त्यामुळे तांडव वेब मालिकेच्या निर्मात्यांनी मागितलेली माफी मान्य नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. खोडसाळपणा करून माफी मागण्याचा प्रकार आता चालणार नाही, अशी प्रतिक्रियाही समाजमाध्यमांवर उमटली.