वार्षिक जिल्हा क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा २७ जानेवारीला

    दिनांक :21-Jan-2021
|
- राज्य स्पर्धेसाठी होणार निवड
नागपूर, 
जिल्हा अ‍ॅथलेटीक्स संघटनेच्या वतीने ड्रीम प्लॅनर सामाजिक संस्थेच्या सहकार्याने येत्या २७ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा क्रॉस-कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल अ‍ॅथलेटीक्स ट्रॅक मानकापूर येथे करण्यात आले आहे. स्पर्धेत पात्रता कामगिरी करणाèया खेळाडूंची राज्य स्पर्धासाठी जिल्हा संघात निवड होणार आहे.

d _1  H x W: 0  
 
स्पर्धा अकरा वयोगटात होणार असून यात ०६, ०८, १०, १२, १४, १६, १८ आणि २० वर्षाखालील वयोगटात मुला-मुलीच्या व खुला महिला व पुरुष गट व यावर्षी ३५ वर्षाखालील व ३५ वर्षावरील महिला व पुरुष असे एकूण अकरा वयोगट आहेत. राज्य स्पर्धेसाठी १६, १८, २० व खुला महिला व पुरुष याच वयोगटातील स्पर्धक राज्य स्पर्धेकरिता पाठविण्यात येतील. ६, ८, १० व १२ वर्षाखालील मुला-मुलीच्या स्पर्धा आणि ३५ वर्षाखालील व ३५ वर्षावरील महिला व पुरुषांच्या स्पर्धा फक्त जिल्हा स्तरापर्यंतच मर्यादित आहेत.
 
 
स्पर्धेसाठी प्रवेश करताना स्पर्धकांनी एनडीडीए आय कार्ड, किंवा आधार कार्ड सह ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचेद्वारा देण्यात येणारा जन्मतारखेचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. एनडीडीए कार्ड धारकांना अन्य कुठलेही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही. २५ जानेवारी स्पर्धेच्या
 
प्रवेशाची अंतिम तिथी असून दिनांक २६ जानेवारी सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजेपर्यंत याच वेळेत लॉ कॉलेज चौक, रविनगर येथे बिब क्रमांक वितरीत केल्या जातील. यावेळी प्रवेश शुल्कासह प्रवेशिका प्रत सोबत आणावी. स्पर्धेसाठी प्रती खेळाडू २०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले असून ३५ वर्षाखालील व ३५ वर्षावरील महिला व पुरुष यांचे प्रवेश शुल्क ४०० रुपये राहणार आहे. ज्या खेळाडूंनी एनडीडीएचे कार्ड तयार केले नसतील, त्याना प्रवेश शुल्का व्यतिरिक्त रुपये ५०/- अधिक द्यावे लागतील.
 
स्पर्धेत ६ वर्षाखालील मुले-मुली - ४०० मीटर, ८ वर्षाखालील मुले-मुली - ६०० मीटर, १० वर्षाखालील मुले-मुली - ८०० मीटर, १२ वर्षाखालील मुले- मुली - १ किमी, १४ वर्षाखालील मुली - १ किमी, मुले - २ किमी, १६ वर्षाखालील मुलं-मुली - २ किमी, १८ वर्षाखालील मुली- ४ किमी आणि मुले ६ किमी, २० वर्षाखालील मुली - ६ किमी, मुले- ८ किमी, खुला महिला व पुरुष - १० किमी, ३५ वर्षाखालील व ३५ वर्षावरील महिला व पुरुष - १० किमी. स्पर्धेच्या आयोजनासाठी एस. बी. सिटी महाविद्यालयाचे डॉ. संजय चौधरी यांचे अध्यक्षतेखाली आयोजन समितीचे गठन करण्यात आले असून रामचंद्र वाणी स्पर्धा संचालक आहेत. अर्चना कोटटेवार, प्रा. बंटी प्रसाद यादव(स्पर्धा तांत्रिक प्रमुख), डॉ. विबेकानंद qसघ(स्पर्धा संयोजक), डॉ. अविनाश सहारे, प्रा. अनिल भोरे, ईच्छा सहारे हे आयोजन समितीचे सदस्य आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धा संचालक रामचंद्र वाणी, प्रा. बंटी यादव यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेसाठी आवश्यक वयोगट-
६ वर्षाखालील मुलं-मुली २२/०२/२०१५ - २१/०२/२०१७.
८ वर्षाखालील मुलं-मुली २२/०२/२०१३ - २१/०२/२०१५.
१० वर्षाखालील मुलं-मुली २२/०२/२०११ - २१/०२/२०१३.
१२ वर्षाखालील मुलं- मुली २२/०२/२००९ - १/०२/२०११.
१४ वर्षाखालील मुलं-मुली २२/०२/२००७ - २१/०२/२००९.
१६ वर्षाखालील मुलं-मुली २२/०२/२००५ - २१/०२/२००७.
१८ वर्षाखालील मुलं-मुली २२/०२/२००३ - २१/०२/२००५.
२० वर्षाखालील मुलं-मुली २२/०२/२००१ - २१/०२/२००३