राहटी येथे 34 वर्षीय व्यक्तीस केले ठार

    दिनांक :21-Jan-2021
Total Views |
- ग्रामपंचायत निवडणुकीतील विरोधकाचा वचपा

दिग्रस, 
दिग्रसपासून 7 किमी अंतरावरील राहटी येथे बुधवार, 20 जानेवारी एका 34 वर्षीय व्यक्तीस ठार केल्याच्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.
 
 
y21Jan-Rahati.1_1 &n
 
कोंडबा लक्ष्मण हटकर असे यातील मृतकाचे नाव असून तो संध्याकाळी 5 च्या दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या विश्वास गव्हाणे यांच्या विजयी जल्लोषात सामील झाला. दरम्यान गव्हाणे याने, तू मतदान केले नाही, तू येथे कसा आला यावरून वाद घातला व कोंडबाला मारहाण झाली. त्यातच तो ठार झाल्याची तक‘ार संगीता कोंडबा हटकर व भिका हटकर यांनी दिग‘स पोलिस ठाण्यात नोंंदवली आहे.
 
 
रात्री 8 च्या सुमारास कोंडबाचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात नेमका कोणी आणला याचा अजून थांगपत्ता नसल्याने हा वाद आणखी वाढला आहे. गुरुवार, 21 जानेवारीला सकाळी 9 वाजता मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात येऊन घटनेशी संबंधित सर्वांना अटक करण्याची मागणी केली आहे. परंतु या घटनेतील मुख्य आरोपी विश्वास गव्हाणे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी हाती घेतला आहे.