बेंच प्रेस व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २४ ला

    दिनांक :21-Jan-2021
|
नागपूर, 
फॅक्ट फिटनेस असोसिएटतर्फे नागपूर जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित पुरुष व महिलांची पहिली फॅक्ट फिटनेस क्लासिक बेंच प्रेस व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धा येत्या २४ जानेवारीला सदर येथील पॅरामाऊंट जीममध्ये होणार आहे.
 

lift powerlifting_1  
 
स्पर्धेत शहरातील विविध जीम व इन्स्टिट्यूटचे शंभरपेक्षा अधिक पॉवरलिफ्टर्स सहभागी होणार आहेत. पुरुषांची स्पर्धा ५९, ६६, ७४, ८३, ९३ व ९३ किलोवरील गटात, तर महिलांची स्पर्धा ५२, ५७, ६३, ७२ आणि ७२ किलोवरील गटात खेळली जाणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना मेडल्स, प्रमाणपत्र व भेटवस्तूही दिल्या जाणार आहे. स्पर्धेत सुपर मॅन ऑफ नागपूर व सुपर वुमन ऑफ नागपूरसह एकूण चार किताब देण्यात येणार आहेत. स्पर्धा सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. स्पर्धेदरम्यान शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.
 
 
आयएफबीबी प्रो गोल्ड विजेती पुण्याची प्रसिध्द आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर तेजस्विनी पंडीत आणि मिस्टर इंडिया क्लासिक विजेता किशन तिवारी स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय रोहित साहू व अन्वर बेग विशेष अतिथी म्हणून राहणार आहेत. प्रवेश शुल्क पाचशे व एक हजार रुपये आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव सुनील फुलझेले यांनी केले आहे.