पाकिस्तानचे क्षेपणास्त्र उडाले आणि देशातच कोसळले

    दिनांक :21-Jan-2021
|
-अनेक जण जखमी, घरांचेही नुकसान
-बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीकडून टीका
 
पेशावर, 
पाकिस्तानने बुधवारी ज्यो बायडेन यांच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथेपूर्वी शाहीन-3 क्षेपणास्त्रचे परीक्षण केले. मात्र, ते देशातच कोसळल्याने अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काही घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही दुर्घटना बलुचिस्तानातील डेरा बुग्ती भागात घडली.
 
 
pak misail_1  H
 
पाकिस्तानी लष्कराने बुधवारी शाहीन-3 या क्षेपणास्त्राचे डेरा गाझी खानमधील राखी भागातून यशस्वी परीक्षण केले. मात्र, काही तांत्रिक चुकामुळे ते बुग्तीमधील लोकवस्तीत कोसळले. देशभरात यावर संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तानला प्रयोगशाळा बनवली आहे. रिपब्लिकन पार्टीचे प्रवक्ता शेर मोहम्मद बुग्ती यांनी म्हटले की, बलुचिस्तान आमची मातृभूमी असून, ही कोणत्याही प्रकारची प्रयोगशाळा नाही. जगाने पाकिस्तानच्या या कृत्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.
या संदर्भात पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, आत्मरक्षणाच्या धोरणाअंतर्गत हे परीक्षण करण्यात आले.
 
 
भारताला समोर ठेवून ही कामगिरी केली. ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तासांपूर्वी हे यशस्वी परीक्षण करण्यात आले. पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करण्याबाबत बायडेन प्रशासनाकडून भारतावर दबाव आणण्यासाठी ही कृती केल्याची मल्लिनाथीही या अधिकार्‍यांनी केली. दरम्यान, पाकिस्तानने बुधवारी 2 हजार 750 किमीची मारकक्षमता असलेल्या शाहीन-3 क्षेपणास्त्राचे परीक्षण केले. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या शास्त्रज्ञांची कौतुकाने पाठही थोपटली. मात्र, काही मिनिटांतच ते कोसळल्याने त्यावर वाद निर्माण झाला असून, पाक सरकारवर टीका होत आहे.