ट्रम्प यांनी लिहिले ‘अतिशय उदार पत्र’ : बायडेन

    दिनांक :21-Jan-2021
|
वॉशिंग्टन, 
व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला एक ‘अत्यंत उदार पत्र’ लिहिले आहे, असे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले.
 
 
biden_1  H x W:
 
मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या उत्तराधिकार्‍यांना पत्र लिहिण्याची आणि ते ओव्हल कार्यालयात ठेवण्याची प्रथा आहे. तथापि, माजी राष्ट्राध्यक्षांनी अर्थात् ट्रम्प यांनी मागील अनेक वर्षांपासूनच्या परंपरा तोडल्या. यात ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याचा देखील समावेश होता. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे औपचारिक अभिनंदन देखील केले नव्हते.
 
 
या सार्‍या पृष्ठभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्षांना ‘उदार पत्र’ लिहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते पत्र खाजगी असल्यामुळे आपण ट्रम्प यांच्याशी बोलल्याशिवाय त्याबद्दल बोलणार नाही. परंतु ते त्यांचे औदार्य होते, असे बायडेन यांनी बुधवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांना सांगितले. ट्रम्प यांच्याशी बोलण्याची आपली योजना असल्याचेही ते म्हणाले.