वधूवर परिचय मेळावा व मार्गदर्शन रविवारी

    दिनांक :22-Jan-2021
Total Views |
यवतमाळ :
महामानव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन आणि उपवर-वधूंसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार, 24 जानेवारीला करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्‍हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डॉ. शिंगाडे, अ. ना. खंडारे मार्गदर्शन करणार आहेत.
 

Vivah _1  H x W 
 
सर्व जातीधर्माच्या पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन उपस्थित राहावे. पालकांनी आपल्या पाल्यांचे रंगीत फोटो व परिचयपत्र घेऊन यावे. नावनोंदणी करून परिचयासाठी उपवर-वधूंनी उपस्थित राहावे. नोंदणीसाठी हर्षवर्धन ठमके (9765996325) शिरभाते प्लॉट, बांगरनगर, यवतमाळ येथे संपर्क साधावा.