‘ओपेक’ने घटविले खनिज तेल उत्पादन

    दिनांक :22-Jan-2021
|
रियाध, 
सौदी अरबच्या नेतृत्वातील खनिज तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेकने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. खनिज तेलाच्या उत्पादनात कपात केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका भारताला बसेल.
 

opec_1  H x W:  
 
या आठवड्यात सौदी अरबने तेल उत्पादनात प्रतिदिन 10 लाख बॅरल्सची कपात केली आहे. दुसरीकडे ओपेकच्या सदस्य देशांनी 97 लाख बॅरल्स तेलाचे उत्पादन कमी करण्याचे जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या योग्य किमती निश्चित करण्यावर भर दिला जावा. असे करणे उत्पादक आणि ग्राहक दोघांच्याही हिताचे आहे. खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय जागतिक आर्थिक सुधारणांसाठी चांगला निर्णय नाही, असे ट्विट भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.