प्राची गोडबोले ठरली विजेती

    दिनांक :23-Jan-2021
|
- बुंदेलखंड मॅराथॉन

नागपूर, 
मध्यप्रदेशातील छतरपूर येथे संपन्न झालेल्या ३० किमी अंतराच्या बुंदेलखंड मॅराथॉन स्पर्धेत शहरातील ट्रॅक स्टार अ‍ॅथलेटिक्स क्लबच्या प्राची गोडबोले हिने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. प्राचीने हे अंतर एक तास ५४ मिनिटात पूर्ण करीत जेतेपद प्राप्त केले आहे.
 

Run-23.A_1  H x 
 
स्पर्धेत दुसरे स्थान अलाहबादच्या नीता पटले हिने प्राप्त केले. तिने २ तास ६ मिनिटाची वेळ नोंदवित स्पर्धा पूर्ण केली. तर झाशीच्या शीलू यादवने ३ तास २ मिनिटे ८ सेकंदाची वेळ नोंदवित तिसरे स्थान प्राप्त केले. पं. गणेश प्रसादर मिश्र सेवा न्यास यांच्याद्वारे आयोजित या शर्यतीत प्राचीने सुरुवातीपासूनच आघाडी घेत ही शर्यंत जिंकली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील प्राचीचे हे पहिलेच यश असून रेशीमबाग मैदानावर ती रविंद्र टोंग यांच्या मार्गदर्शनात सराव करते. प्राचीच्या यशाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक व नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सुर्यवंशी यांच्यासह अध्यक्ष गुरुदेव नगराळे, सभापती उमेश नायडू, कोषाध्यक्ष डॉ. संजय चौधरी, उपाध्यक्ष नागेश सहारे, शेखर सुर्यवंशी, रामचंद्र वाणी, अर्चना कोट्टेवार आदींनी अभिनंदन केले आहे.