टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २६ पासून

    दिनांक :23-Jan-2021
|
नागपूर, 
शिवभोला क्रीडा मंडळातर्फे २६ जानेवारीपासून धवल कुथे स्मृती टेनिस बॉल क्रिकैट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रकाशझोतात ही स्पर्धा रामनगर येथील मरारटोली मैदानावर रंगणार आहे.
 
 
tenis ball_1  H
 
स्पर्धेतील सामने बाद पद्धतीने होणार असून विजेत्या संघाला ३१ हजार रुपये तर उपविजेत्या संघाला २१ हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात येणार आहे. यासह खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी २ हजार रुपायाचे शुल्क आकारण्यात येणार असून प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे. अधिक माहितीसाठी सिद्धार्थ काळे व अतुल नेवारे यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांनी दिली.