ट्रम्प यांच्यावर 8 फेब्रुवारीपासून महाभियोग खटला

    दिनांक :23-Jan-2021
|
वॉशिंग्टन, 
संयुक्त राज्य अमेरिकेची प्रतिनिधी सभा (सिनेट) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग खटल्याची सुनावणी 8 फेब्रुवारीपासून सुरू करणार असल्याचे सभागृहाचे नेते चक शुमर यांनी सांगितले. 6 जानेवारी रोजी कॅपिटॉल इमारतीत झालेल्या हिंसाचाराला ट्रम्प यांनी चिथावणी दिल्याचा आरोप होत आहे. हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात कुणीही विसरू शकणार नाही, असे शुमर यांनी सांगितले. सत्य आणि जबाबदारीची जाणीव असेल तरच एकता नांदेल. हे लक्षात घेऊनच आम्ही महाभियोगाचा प्रस्ताव आणत असल्याचे चक शुमर म्हणाले.
 
 
tramp khatala_1 &nbs
 
100 सदस्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडे आता प्रत्येकी 50 जागा आहेत. तथापि, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे मतदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांनी डेमोक्रॅट्सना पारड्यात मत टाकल्यास डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत होईल. सोमवारी सायंकाळी 7 वाजता महाभियोगाचा लेख वाचण्यासाठी गृहप्रबंधक येतील. त्यानंतर सदस्यांना दुसर्‍या दिवशी शपथ दिली जाईल, असे महाभियोग प्रक्रियेची माहिती देताना शुमर म्हणाले. त्यानंतर, गृह व संरक्षण या दोन्ही विभागांना मागीलप्रमाणेच कायदेशीर संक्षिप्त मसुदा तयार करण्यासाठी काही कालावधी देण्यात असेल, असेही त्यांनी सांगितले. महाभियोगाची सुरुवात अभूतपूर्व वेगवान आणि किमान प्रक्रियेने झाली, असे सिनेट अल्पसंख्यक नेते मिच मॅककॉनेल यांनी सांगितले.