ओटीपी क्रमांक विचारून 76 हजार केले लंपास

    दिनांक :24-Jan-2021
|
तभा वृत्तसेवा
आर्वी, 
क्रेडीट कार्ड बंद करायच आहे का असे अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून विचारून खाते बंद करण्याकरिता भ्रमणध्वनीवरुन विनंती संदेश पाठवण्याची सुचना दिली. खातेदाराच्या भ्रमणध्वनीवर ओटीपी नंबर आला. खातेदाराने तो अज्ञात व्यक्तीला दिला असता दोन मिनिटात 76 हजार रुपये लंपास करण्यात आले.
 
s_1  H x W: 0 x
 
कन्नमवारनगर येथील सुनील धुळे यांचे येथील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी शाखेत खाते आहे. त्यांनी त्यावर क्रेडीट कार्ड घेतले असुन 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची त्यांना मुभा आहे. या क्रेडिटकार्डच्या माध्यमातुन त्यांनी व्यवहार सुद्धा केला मात्र व्याजदर परवडत नसल्याने दोन महिण्यापुर्वी खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. येथील शाखेत जावुन कार्ड कंपनीच्या कर्मचार्‍याची भेट घेतली व खाते बंद करण्यासाठी सांगुन परत आले. मात्र त्यांचे खाते काही बंद झाले नाही. तब्बल दोन महिण्यानंतर त्यांच्या सोबत 9090274994 या भ्रमणध्वनीवरुन अज्ञात केला. स्टेट बँकेमधुन बोलतो अशी बतावणी करुन तुम्ही क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी विनंती पाठवली होती काय अशी विचारणा केली. सुनील धुळे यांनी त्याला होकार दिला. खाते बंद करण्याकरिता पुन्हा भ्रमणध्वनीवरुन विनंती पाठवण्याची सुचना केली. ओटीपीनंबर पाठवण्याची विनंती केली. त्यांनी ओटीपी नंबर अज्ञात व्यक्तीला सांगताच काही वेळेने पहिले 51 हजार 43 रुपये त्यानंतर 25 हजार रुपये असे 76 हजार 43 रुपये काढण्यात आले. या घटनेची तक्रार स्टेट बँकेच्या कृषी शाखेला केली असुन फसवणुक करणार्‍यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी आणि खात्यातुन लंपास झालेली रक्कम परत मिळवावी अशी मागणी करण्यात आली आहे.