कोव्हिशिल्डचा चिनी लसीला दणका

    दिनांक :24-Jan-2021
|
-अनेक देशांचा कल भारताकडे
नवी दिल्ली, 
अ‍ॅस्ट्रा-झेनेकाने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित कोरोनाविरोधी लसींच्या 50 लाख मात्रा विविध देशांना केंद्र सरकारने उपलब्ध करून दिल्यानंतर, या लसींची मदत म्हणून तसेच व्यावसायिक पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती कित्येक देशांनी केली आहे. मात्र, या कोव्हिशिल्डने चिनी लसीला दणका दिला असून, अनेक देशांचा कल भारताकडे आहे.
 
A_1  H x W: 0 x
 
ब‘ाझील आणि कंबोडियासह कित्येक देशांनी कोरोनाविरोधी लस खरेदी करण्याचा प्रस्ताव चीनकडे सादर केला होता. परंतु, चिनी लसीच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याने हे देश आता भारताकडे वळले आहेत. व्यावसायिक पुरवठा म्हणून भारताने लसीच्या 20 लाख मात्रांचा ब‘ाझीलला शुक‘वारी पुरवठा केला. सीरमची कोव्हिशिल्ड आणि चीनची कोरोनाव्हॅक यापैकी कोणती लस विकत घ्यायची या मुद्यावर ब‘ाझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो व काही राज्यपालांमध्ये मतभेद होते. मात्र, अखेर कोव्हिशिल्डची सरशी झाली.
 
आठवडाभरात कोरोनाविरोधी लसीकरणाची मोहीम राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यातून सुरू करायची असल्याने कोव्हिशिल्ड लसीच्या 20 लाख मात्रांचा पुरवठा करण्यात यावा, असे पत्र बोल्सोनारो यांनी 8 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. मात्र, त्यावेळी देशातील लसीकरण मोहीम सुरू झाली नसल्याने व्यावसायिक पुरवठा तसेच मदत म्हणून कोरोनाविरोधी लस कधी उपलब्ध करून द्यायची, याचा काळ अधिकार्‍यांना निर्धारित करावा लागला होता.
 
इंडोनेशियातील लसीकरण मोहिमेसाठी चीनने 30 लाख कोरोनाव्हॅकचा निःशुल्क पुरवठा या देशाला केला. परंतु, आता हा देश कोव्हिशिल्ड लसीची मागणी भारताकडे करीत आहे. या देशातील इंडोफार्मा ही कंपनी लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटसोबत वाटाघाटी करीत आहे. इंडोनेशियाला लवकरच कोव्हिशिल्डचा पुरवठा केला जाईल, असे या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले.
कंबोडियाने देखील कोव्हिशिल्डची मागणी केली आहे. कंबोडिया कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी विकत घेण्यास उत्सुक आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंबोडियाने चीनकडून अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतले असून, चीनने लसीच्या 10 लाख मात्रा या देशाला निःशुल्क दिल्या आहेत. चीनने केलेल्या पुरवठ्यापेक्षा कंबोडियाची मागणी कितीतरी जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.