ईडीची मुंबईतील बांधकाम समूहावर छापेमारी

    दिनांक :25-Jan-2021
|
- यस बँक प्रकरणी कारवाई
नवी दिल्ली,
यस बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने मुंबईतील एका स्थावर मालमत्ता आणि बांधकाम समूहाच्या किमान १० ठिकाणांवर आज सोमवारी छापेमारी केली, अशी ओंकार रीअल्टर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या समूहाच्या ७ निवासस्थानांवर आणि ३ कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत अधिक पुरावे गोळा करण्यासाठी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
ed_1  H x W: 0
 
कंपनीचे अध्यक्ष किशोर गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबुलाल वर्मा यांनी ओंकार समूहाची स्थापना केली आहे. झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाच्या योजनांतर्गत देण्यात आलेल्या विविध परवानग्यांचा गैरवापर या समूहाने केला, तसेच यस बँकेकडून ४५० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ही रक्कम वळती केल्याचा आरोप या समूहावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
राणा कपूरला जामीन देण्यास नकार
मुंबई : यस बँकेचा संस्थापक राणा कपूरला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज सोमवारी नकार दिला. बेकायदेशीर सावकारी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने त्याला अटक केली आहे. राणा कपूर, त्याची पत्नी आणि तीन मुलींना ६०० कोटी रुपयांची रक्कम डीएचएफएल कंपनीतून त्यांचे नियंत्रण असलेल्या एका कंपनीला प्राप्त झाल्याच्या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय करीत आहे.