तणाव कमी करण्यासाठी माघारी फिरा

    दिनांक :25-Jan-2021
|
- भारताची चिनी लष्कराला समज
नवी दिल्ली,
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी माघारी फिरा, अशी समज भारताने चिनी लष्कराला दिली. रविवारी भारत आणि चीनमध्ये लष्करी कमांडर पातळीवर तब्बल १६ तास झालेल्या बैठकीनंतर या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्ष असलेल्या भागांतून एकाचवेळी माघारीची प्रक्रिया सुरू व्हावी. कोणतीही निवडक भूमिका मान्य केली जाणार नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे. रविवारी सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली ही कमांडर पातळीवरील बैठक सोमवारी पहाटे २.३० वाजेपर्यंत सुरू होती. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील मोलडो येथे ही बैठक झाली. या बैठकीत नेमके काय निष्पन्न झाले, याची माहिती मात्र समोर आलेली नाही.
 
 
chinaindia_1  H
 
या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी चीनने सर्वप्रथम माघारीची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असल्याचे भारताने चीनला सांगितले. लष्कराच्या माघारीची ही प्रक्रिया दोन्ही देशांनी एकाचवेळी सुरू करणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज राहण्यासाठी दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये १० हजार जवान तैनात केले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश राजनयिक पातळीवर देखील चर्चा करीत आहेत. राष्ट्रीय उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान दीर्घकाळापर्यंत दीर्घकाळापर्यंत ठाण मांडून राहतील, असे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी दोन आठवड्यांपूर्वी स्पष्ट केले होते. हा मुद्दा हाताळण्यासाठी भारताने कठोर भूमिका घेतल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले होते. पेंगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण किनाèयावर पकडलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानाला सोपवल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी कमांडर पातळीवरील ही बैठक झाली.