यंदाच्या साहित्य संमेलनाला विज्ञान-संशोधनाची किनार

    दिनांक :25-Jan-2021
|
-डॉ. नारळीकरांची निवड कोणत्याही वादाशिवाय
नाशिक,
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्र तसेच लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी निवड झाली असून, या संमेलनाला विज्ञान-संशोधनाची किनार लाभणार असल्याचे सांगण्यात येते. शिवाय कोणत्याही वादाशिवाय वा नाराजीच्या परिस्थितीत ही निवड झाली नसल्याने साहित्य क्षेत्रातील अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
 
jayant_1  H x W
 
डॉ. नारळीकरांचे वडील वाराणसी येथील बनारस qहदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख असल्याने त्यांचे शालेय शिक्षण वाराणसीत झाले. सन १९५७ मधील विज्ञानातील पदवीनंतर त्यांनी ब्रिटनमधील कें ब्रिज येथे उच्च शिक्षण घेतले. १९७२ साली भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. सन १९८८ मध्ये त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
 
 
विज्ञानविषयक वाङ्मय
डॉ. नारळीकरांनी विज्ञानसाहित्य क्षेत्रात अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. यात नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, अंतराळातील भस्मासूर, टाईम मशिनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नात, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरूडझेप, विज्ञानाचे रचयिते आदींचा समावेश आहे.
 
 
डॉ. नारळीकरांची पुस्तके जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली असून, अनेक मान-सन्मान प्राप्त झाले आहेत. विविध मराठी नियतकालिकांतूनही त्यांचे विज्ञानविषयक लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. दरम्यान, कोल्हापुरात १८ जुलै १९३८ रोजी जन्मलेले डॉ. नारळीकर यांनी मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी विवाह केला. त्यांना गीता, गिरिजा, लीलावती अशा तीन कन्या आहेत.
 
सन्मान
- सन १९६५ पद्मभूषण, सन २००४ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार
-डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिर्ला सन्मान
- राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून इंदिरा गांधी पारितोषिक
-सन १९९६ मध्ये युनेस्कोतर्फे कqलग पारितोषिक
- खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार