नवी दिल्ली,
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढायला सुरुवात केली आहे. या ट्रॅक्टर रॅलीच्यामुळे नागरिकांना त्रास किंवा असुविधा होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून हजारो शेतकरी सीमोल्लंघन करत दिल्लीत प्रवेश करणार आहेत. ही सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमा ओलांडत दिल्लीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळं साऱ्या राष्ट्राचं या रॅलीकडे लक्ष लागून राहिलं आहे.