जनता दरबारात जनता बाहेर, अधिकारी आत!

    दिनांक :27-Jan-2021
|
-दूर दुरून आलेले लोक कित्येक तास ताटकळत...
भंडारा,
बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील लोकांची गार्‍हाणी ऐकावीशी वाटली. 26 जानेवारी च्या दिवशी म्हणूनच जनता दरबाराचे आयोजन केले गेले. खरंतर जनता दरबार हा जनतेसाठी होता. मग जनता ताटकळत दरबार घेणाऱ्याची वाट पाहत होती आणि अधिकारी मात्र सभागृहात निवांत बसले होते. जनतेसाठी जर जनता दरबार घेतला असेल तर त्यांच्यावर तासनतास वाट पाहण्याची वेळ का यावी. मग याला खरंच जनतादरबार म्हणायचा का हा ही प्रश्न पडतो.

a_1  H x W: 0 x 
 
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम यांनी जिल्हा वासियांची आस्थेने विचारपूस केली आहे का हा प्रश्न पडतो. दुर्दैवी घटना घडल्यानंतर आतापर्यंत जिल्हावासीयांना दिसणारे पालकमंत्री झेंडावंदन साठी येतात याची खात्री पुन्हा एकदा आम्हाला पटली. यावेळी पहिल्यांदा मंत्री महोदयांनी जनतेच्या समस्या ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात चक्क जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. ज्यांना ज्यांना ज्या ज्या समस्या असतील त्या घेऊन जनता दरबारात आपली गाऱ्हाणी मांडावी असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
 
सकाळी 10.30 वाजताची वेळ देण्यात आली होती. मंत्री म्हटल्यानंतर उशीर होणारच. पण तो किती व्हायला पाहिजे हेही महत्त्वाचे. सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात हजेरी लावली. पण या जनतेला बसायला जागाही तिथे नव्हती. ज्या सभागृहात हा जनता दरबार घेतला गेला होता तेथे केवळ अधिकारी निवांत बसले होते. जनता मात्र जिल्हा परिषदेच्या आवारात मंत्रीमहोदय यांची वाट पाहत होती. आता तू बघायचं म्हटलं तर कुणालाही प्रवेश नव्हता. दीड तासाच्या विलंबानंतर मंत्रीमहोदय पोहोचले आणि जनता दरबार सुरू झाला.हुशार असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तक्रारी घेऊन आलेल्या जनतेचे अर्ज आधीच घेऊन ठेवले होते. साहेब आले आणि अर्ज वाचून त्या त्या लोकांचे नाव पुकारले गेले. ज्यांची नावे घेतली त्यांनी येऊन गार आणि मांडायची आणि दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. आलेल्या अनेकांसाठी हा जनता दरबार काहीतरी वेगळाच होता.
 
 
aa_1  H x W: 0
खरंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना साधी बसण्याची व्यवस्था आहे प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. त्यातही अधिकारी मात्र निवांत गार वाऱ्यात बसले होते. आता नाव जनता दरबार आणि या दरबारात जनताच नसेल तर खरंच हा जनता दरबार होता अधिकाऱ्यांचा दरबार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. केवळ कुळाचार किंवा औपचारिकता करण्यासाठी जर अशा दरबारांत आधार घेतला जात असेल तर हे काम तालुक्याच्या ठिकाणीही पालक मंत्री महोदयांच्या सांगण्यावरून अधिकारी करू शकतील? मग हा एवढा उपद्व्याप करण्याची गरज काय?