प्रजासत्ताक दिनी वर्षानुवर्षाची परंपरा खंडित

    दिनांक :27-Jan-2021
|
कुरखेडा,
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशात नियोजित ठिकाणी झेंडावंदन साजरा करण्यात आले. मात्र, कुरखेडा येथील नगरपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे नगरातील दहा वार्डात असलेल्या चौकामध्ये स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त नियमित झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असताना यावर्षी मात्र, नगरपंचायत कार्यालय सोडून इतर ठिकाणी झेंडावंदन झाले नसल्याने वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा खंडीत झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
 
a _1  H x W: 0
 
याबाबत येथील काही जागरूक नागरिकांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी नमिता बांगर यांच्याकडे विचारणा केली असता २६ जानेवारी व १५ ऑगस्ट देशभक्ती उफाळून येते का? नगरातील १० झेंडे फडकले नाही तर कोणता असा फरक पडला असे सुनावण्यात आले, तर येथील प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी काही ऐकून नघेता हा विषय येथेच थांबवा. असे म्हणत असल्याचे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या तक्रारीत ध्वजारोहण नकरून देशाचा अपमान करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ईश्वर ठाकरे,अनिकेत आकरे,मुकेश माकडे,एजाज शेख, तलत सय्यद, भावेश मुंगणकर,चेतन मडावी,साईनाथ कोंडावर  यांच्या सह इतरांनी दिला.
 
याबाबत माजी प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रजासत्ताक दिनाच्या नियोजना संदर्भात पाच दिसवसापूर्वी मुख्याधिकारी यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, प्रशासकीय अधिकारी यांना सूचित करून नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींना विश्वासात घेऊन शहरातील ध्वजारोहण कार्यक्रम करण्याचे सांगितले होते. मात्र, सुचनेची दखल घेतली नसल्याचे गोटेफोडे यांनी सांगितले. तर मुख्याधिकारी नमिता बांगर यांचेशी भ्रमणध्वनिवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.