अंबाझरी तलवाच्या मध्यभागी फडकला तिरंगा

    दिनांक :27-Jan-2021
|
नागपूर,
गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून अंबाझरी जलसंरक्षण व संवर्धन समिती आणि शार्क अ‍ॅक्वेटिक स्पोर्टींग असोसिएशन द्वारा शहरातील जलप्रेमींनी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण केले. अंबाझरी तलावाच्या पाचशे मीटर दूर मध्यभागी ६० फूट खोल पाण्यात मध्यभागी असलेल्या खांबावर पूर्व काठावरुन पोहत जावून तिरंगा फडकाविला. या उपक्रमात सर्व वयोगटातील लोकांनी सहभाग नोंदविला. सर्व जलतरणपटूंनी शिस्तबद्ध रीतीने पाण्यावर संतूलन साधून ध्वजाला सलामी दिली, तसेच राष्ट्रगीत गावून ध्वजाला वंदन करीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. या साहसपूर्ण आणि अनोखे ध्वजारोहण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तलावाच्या काठावर एकच गर्दी केली होती.
 
 
tiranga_1  H x
 
या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात लहान पाच वर्षीय जलतरणपटू रिद्धी सालबर्डे हिने एक किमी अंतर पूर्ण केले. तर नेत्रहीन ईश्वरी पांडेने देशभक्तीपर गीतही सादर केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभाकर साठे होते. सायंकाळी पाच वाजता ध्वजावतरण करण्यात आले. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबाझरी जलसंरक्षण व संवर्धन समिती, शार्क अ‍ॅक्वेटिक स्पोर्टींग असोसिएशन आणि टायगर ग्रुप ऑफ अ‍ॅडव्हेंचरच्या कार्यकत्र्यांनी प्रयत्न केले.