11 पेट्या देशी दारूसह कार जप्त

    दिनांक :27-Jan-2021
|
-प्रजासत्ताकदिनी पोलिसांची कारवाई
तभा वृत्तसेवा
तिवसा, 
प्रजासत्ताक दिनी दारूबंदी असताना येथील शिक्षक कॉलनी परिसरात अवैध देशी दारूवर तिवसा पोलिसांनी धाड टाकून तेथून दारूच्या 11 पेट्यासह झेन गाडी असा एकूण 1 लाख 1 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 

a_1  H x W: 0 x 
प्रदीप ढोबळे (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मारुती झेन क्रमांक एमएच-29एन 615 या वाहनात देशी दारूच्या एकूण 11 पेट्या आणल्याची माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश मस्के, पोकॉ अरविंद गावंडे, रोहित मिश्रा, रोशन नंदरधने, राजेंद्र चव्हाण, नरसिंग राठोड यांनी सकाळी 10 वाजता धाड टाकून तेथून 31, 740 रुपये किंमतीची दारू व 70 हजार रुपयांची गाडी असा एकूण 1 लाख 1 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.