गोंड समुहाची संस्कृती, इतिहास मांडण्यासाठी ‘गोंडवाना थीम पार्क'

    दिनांक :27-Jan-2021
|
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिकृत घोषणा
- बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे थाटात उद्घाटन
नागपूर,
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका, आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे. गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये ‘गोंडवाना थीम पार्क' उभारणार असल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
 
 
gondwana_1  H x
 
महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरणही केले. तसेच या उद्यानातील जंबू अस्वलाच्या प्रतिकाचे अनावरण केल्यानंतर उद्यानाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान राजकुमार वाघ, बिबट तसेच अस्वलाच्या पिल्लांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
 
मुख्य कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, खा. कृपाल तुमाने, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, दुष्यंत चतुर्वेदी, डॉ. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, सुधीर सुर्यवंशी, नितीन देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिqलद म्हैसकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक- वनबल प्रमुख डॉ. एन. रामाबाबू, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, प्रधान मुख्य वन संरक्षक- वन्यजीव नितीन काकोडकर, मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते.
 
 
 
याप्रसंगी पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिन्याभरात चार दौरे झाले आहेत. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. देशात आतापर्यंत नसेल अशा प्रकारचे सिंगापूरमधील प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय उद्यान येथे तयार होईल. गोंडसमूह संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला या उद्यानात समर्पकपणे मांडण्यात येईल. नागपूरमध्ये लवकरच सिंगापूर सारखी ‘नाईट सफारी' सुरू करु, त्यासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.
गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी वरदान आहे. गोसीखुर्दच्या पाण्याने विदर्भाचे मागासलेपण धुऊन काढायचे आहे. त्याआधी एक मे पर्यंत समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत धावायला लागेल. लवकरच सुरजगड प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भाचा विकास सुरु राहील. एकसंघ विकास काय असतो हे आघाडी सरकार दाखवून देईल.
 
 
 
सफारी दरम्यान त्यांना ‘गोरेवाडाचा राजकुमार' या डौलदार वाघाचे दर्शन झाले. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले, माणसाचा स्वभाव वाघासारखा विशाल असावा. विदर्भाच्या विकासाबाबत आपला असाच विशाल दृष्टिकोन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या व्यस्ततेत केवळ संजय यांच्या हट्टापायी आज उद्घाटनाला आलो. मात्र हा प्रकल्प सुंदर असून तो निश्चित पूर्णत्वास जाईल. वनमंत्री राठोड यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
 
 
 
यावेळी बोलतांना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दहा संरक्षित अभयारण्य जाहीर करण्यात आले. नागपूर सभोवताल असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहेत. त्यामुळे नागपूर ही खèया अर्थाने देशाची वन राजधानी असून त्यादृष्टीने येथील प्रकल्पाला चालना देण्यात येत आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान निर्मितीसाठी वन विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करतांना विकास, वन आणि पर्यावरण यांची सांगड घालून साकारलेला हा देशातील एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
अध्यक्षीय भाषणात वन मंत्री राठोड म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान प्रकल्पाच्या निर्मितीसाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने शंभर कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यामुळे पहिल्या टप्प्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन होत असून उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान या प्रकल्पाच्या नामकरणासंदर्भात आदिवासी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गोंडवाना थीम पार्क हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यास मंजूरी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 
 
याप्रसंगी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य क्रीडा मंत्री सुनील केदार, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. संचालन श्वेता शेलगावकर तर आभार मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी मानले.
 
पर्यटन विदर्भाचे ग्रोथ इंजिन
पर्यटन हे विदर्भाचे ‘ग्रोथ इंजिनङ्क असल्याचे मत पालकमंत्री डॉ. नितीन राउत यांनी व्यक्त केले. प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समर्पक असून ठाकरे कुटुंबियांनी आपल्या आजोळ असणाèया विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. विदर्भात वनपर्यटन, वन्यजीव पर्यटन सोबतच खान पर्यटनाला प्रचंड संधी आहे. नागपूर, यवतमाळ,चंद्रपूर या ठिकाणी असणाèया खाणीमध्ये हे पर्यटन सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांना नवे आकर्षण निर्माण होईल. नागपुरातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास जावा. गोरेवाडा येथील दोन्ही प्रकल्प जोडण्यासाठी ‘ओव्हरब्रीज' करण्यात यावा. समृद्धीच्या मार्गाने विदर्भाचा विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.