महानगरातील 100 बुलेट दुचाकी जप्त!

    दिनांक :30-Jan-2021
Total Views |
*जवळपास 90 हजारांचा ठोठावला दंड
*स्टंटबाजांची अखेर ठेचली मस्ती
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
प्रजासत्ताक दिनी स्टंटबाजी करणार्‍या दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळे एका इसमाला नाहक गंभीर दुखापत झाली. तो आपल्या यथायोग्य दिशेने आणि नियंत्रित गतीने जात पुढे जात असताना, एका स्टंटबाज तरूणांनी त्यास जोरदार धडक दिल्याचा चित्रफित प्रसारित झाली आणि हा विषय ऐरणीवर आला. पोलिसांवर दबाव आला आणि अखेर अशा स्टंटबाजांची मस्ती पोलिसांनी जिरवली. तब्बल 100 बुलेट गाड्या जप्त केल्या.
 
a_1  H x W: 0 x
 
सध्यणा वाहतूक शाखेने बुलेट गाड्या आणि त्याने स्टंट करणार्‍यांचा शोध सुरू आहे. गाड्या जप्त करण्याची धडक मोहिम राबवली जात आहे. मागील पाच दिवसात जवळपास 100 बुलेट गाड्या जप्त केल्या गेल्या. त्यांच्याकडून जवळपास 90 हजार रूपयाचा दंड वसूल केला गेला, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ह्दयनारायण यादव यांनी दिली.
 
चंद्रपूर महानगरात मागील काही दिवसंपासून बुलेट दुचाकीवास्वारांनी शहरातील महामार्गावर उच्छांद मांडला होता. कर्णकर्कश आवाज, भरधाव वेग यामुळे समोरील दुचाकीस्वाराकाला धडक बसायची. त्यांच्या उच्छादामुळे अपघाताच्या घटनांतही वाढ झाली आहे. प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर विचित्र अपघात घडला. अपघातात निरपराध इसमाला गंभीर दुखापत झाली.
  
या घटनेने जिल्हा पोलिस दलाने गंभीरतेने दखल घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या निर्देशान्वये वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध मार्गावर नाकाबंदी करून अशा वाहनचालकांच्या मुसक्या आवळल्या. आतापर्यंत महानगरात 100 हून अधिक वाहने जप्त केली. त्यांच्याकडून नियमांचा डावलून नंबर प्लेट लावणे, दस्ताऐवज नसणे, वाहतुकीचा परवाना नसणे यासह अन्य वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांविरूद्ध वेगवेगळ्या स्वरूपात दंड आकारला गेल्याची माहिती यादव यांनी दिली. ही मोहीम यापुढेही सुरूच राहील. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यादव यांनी केले आहे.