भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

    दिनांक :09-Jan-2021
|
-कुटुंबियांना ५ लाखाच्या मदतीची घोषणा
भंडारा,
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे .

s _1  H x W: 0  
त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.