नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षाला आग,१० चिमुकल्यांचा मृत्यू/VIDEO

    दिनांक :09-Jan-2021
|
हे वाचा -
भंडारा,
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ८ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. ७ बालकांना वाचविण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे. मृतांपैकी ४ बालकांचा अक्षरशा कोळसा झाला असून उर्वरित बालके धुरामुळे जीव गुदमरल्याने मृत झाल्याचे समजते. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

r_1  H x W: 0 x 
 
 
जिल्ह्यातील अन्य ठिकाणी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मास आलेल्या व परिस्थिती अत्यंत नाजूक असलेल्या बालकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांचा अतिदक्षता कक्ष असतो. कालावधी पूर्ण होण्यापूर्वी जन्मास आलेल्या बालकांना या कक्षात ठेवण्यात येते. इन बॉर्न आणि आउट बोर्न अशा दोन वेगवेगळ्या वर्गीकरणात बालकांना ठेवण्यात येते. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात जन्मास आलेल्या बालकांना इन बॉर्न आणि जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमध्ये जन्मास आलेल्या बालकांना आउट बॉर्न अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येते. दोन्ही पक्ष मिळून जवळपास 17 नवजात बालके गंभीर स्थितीत होती.
 
 
रात्री दोनच्या सुमारास या कक्षातून धूर निघताना कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला दिसून आले. दार उघडून पाहताच प्रचंड धुराचे लोळ येत असल्याने याची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली. याच दरम्यान नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आल्यानंतर गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर इन बॉर्न युनिट चा मागील दरवाजा तोडून ७ बालकांना बाहेर काढण्यात आले मात्र आउटडोअर युनिटमधील 10 बालकांचा या घटनेत जीव गेला. दहापैकी चार बालके जळून अक्षरक्ष: कोळसा झाले होते. उर्वरित सहा बालके धुरामुळे जीव गुदमरून मृत झाले. घटनेतून बचावलेल्या सात बालकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
 
 
 
 
दरम्यान घटनेची माहिती होतात प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक पासून सर्वच वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. आरोग्य उपसंचालक जयस्वाल हे सुद्धा रात्रीच आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जात आहे. नेमके कारण काय हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
 
 
दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ञांची टीम नागपुर वरून बोलाविण्यात आल्याचे सांगितले. घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
घटनेत दगावली सर्व बालके ही ग्रामीण भागातली असल्याने पालकांना सकाळी झालेली नव्हती मात्र माहिती होतात हळूहळू लोकांची जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात गर्दी सुरू झाली होती. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री भंडाऱ्याला येणार असल्याची माहिती आहे.