भंडाऱ्यातील रुग्णालयात शिशूच्या अतिदक्षता कक्षाला आग;चौकशी करून दोषींवर कारवाई करा: खा. मेंढे

    दिनांक :09-Jan-2021
|
भंडारा,
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालकांचा मृत्यु ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे.

s _1  H x W: 0  
जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम भंडाऱ्याला भेट देणार आहेत.
 
 
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी जवळपास 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली. यात 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे.