‘फकीरजी महाराज साथ उत्सव’ आज

- सामाजिक एकोप्याचे प्रतीक

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा 
नेर,  
विविध सण आणि उत्सव ही आपल्या देशाची खास ओळख आहे. नेर तालुक्यातील धनज माणिकवाड्यातील जुळ्या गावात फक्त धनज येथे एक वर्षाआड ‘फकीरजी महाराज साथ उत्सव’ प्रचंड उत्साहात साजरा केला जातो.
 

fakirji _1  H x 
 
 
 
साधारणपणे चारशे वर्षांपूर्वी या गावात फकीरजी महाराजांचे वास्तव्य होते. त्यावेळी गावात वारंवार साथीचे आजार पसरायचे. त्यात अनेक लोक बळी पडायचे. त्यावेळी फकीरजी महाराजांचे निस्सीम भक्त गोविंद महाराज यांनी गावात साथ उत्सव साजरा करा, असे सांगितले. तेंव्हापासून आजतागायत ही परंपरा धनजवासी मोठ्या उत्साहाने जपत आहेत. दरवर्षाआड नवरात्रातील शेवटच्या गुरुवारी हा उत्सव साजरा केला जातो.
 
 
 
यावर्षी आठ ते चौदा ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव पार पडला. या दरम्यान धनजमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण असते. प्रत्येेक घरापुढे रांगोळ्या, ग्रामसफाई आणि रात्री दहा बारा फूट आकाराचा ज्यामध्ये दिवा ठेवलेला असतो असे फुगे उडवले जातात. विशेष म्हणजे, सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. उत्सवाच्या दिवशी सर्वार्ंकडेच पुरणपोळी व तूप अशी मेजवानी आणि घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. संपूर्ण पंचक‘ोशीत सामाजिक एकोप्याचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे बघितले जाते.