राज्यातील पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई,
राज्य सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.
 
purgrasth _1  H
 
 
 
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशाप्रकारे ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.