अजय देवगण दिसणार बेअर ग्रील्ससोबत

    दिनांक :13-Oct-2021
|
 ajay _1  H x W:
 
 
मुंबई, 
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे इंटू द वाईल्ड विथ बेअर ग‘ील्स या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार यांनी हजेरी लावली होती. आता अभिनेता अजय देवगणदेखील या शोमध्ये दिसणार आहे. अजय देवगण आणि बेअर ग्रील्स यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. नुकताच या शोच्या आगामी भागाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या भागात अजय देवगण दिसत आहे. डिस्कव्हरी प्लसने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘यै कोई खेल नही है ब‘ो’, असे अजय बोलताना दिसत आहे. अजय देवगणचा हा एपिसोड 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक‘माचा होस्ट बेअर ग्रील्स हा अत्यंत निर्भिड आणि साहसी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या कार्यक‘मात काम करीत आहे. यात तो प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष करता येतो, याची माहिती देतो.