अलर्ट...विदर्भासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई,
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून मान्सून माघारी परतला आहे. तसेच पुढील एक-दोन दिवसांत राज्यातून मान्सून पूर्णपणे परतणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण विकेंडला विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार (Rain alert) पावसाची शक्यता आहे.  16 ऑक्टोबर रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
 
 
rain _1  H x W:
 
हवामान खात्याने राज्यात रविवारी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, लातूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी कोरड्या हवामानाची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईसह पुणे आणि घाट परिसरात जोरदार पाऊस कोसळला आहे. त्यानंतर आता कोकणासह घाट परिसर, मध्य महाराष्ट्र, मराठवड्यात पावसानं उसंत घेतली आहे. तसेच सध्या राज्यातून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस मुंबईसह पुण्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस कोसळू शकतो.