लसीकरणाबाबत अ‍ॅण्डी मरेची दुटप्पी भूमिका

    दिनांक :13-Oct-2021
|
इंडियन वेल्स, 
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत लस न घेतलेल्या टेनिसपटूंनाही भाग घेता यावा, अशी अपेक्षा अ‍ॅण्डी मरेने व्यक्त केली, मात्र याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंनी संपूर्ण लसीकरण करावे, अशा स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
 
sport _1  H x W
 
मेलबर्नमध्ये पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या खेळाडूनी संपूर्ण लसीकरण करायला हवे, असे व्हिक्टोरियाच्या क्रीडा मंत्री मार्टिन पाकुला यांनी मंगळवारी म्हटले होते. खेळाडूंच्या लसीकरणाबाबत टेनिस ऑस्ट्रेलियाने कोणतीही प्रतिकि‘या दिली नाही. संपूर्ण लसीकरण झालेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात इतरत्र फिरण्याची मुभा असणार आहे तसेच आगमनानंतरच्या 14 दिवसांच्या विलगीकरणातूनही त्यांना सवलत मिळणार आहे.