इंग्लंड-हंगेरी सामन्यात प्रेक्षकांचा गोंधळ

    दिनांक :13-Oct-2021
|
लंडन, 
वेम्बली येथे झालेल्या पात्रता फुटबॉल सामन्यात हंगेरीला 1-1 गोलने बरोबरीत रोखत इंग्लंडने 2022 विश्वचषकासाठी पात्रता सिद्ध करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. इंग्लंडने तीन स्पष्ट गुणांसह आय गटात अव्वल स्थान मिळविले असून आता त्यांचे दोन सामने शिल्लक आहे. या बरोबरीत सुटलेल्या सामन्यात हंगेरी संघाच्या समर्थकांनी गोंधळ घातला.
 
sport _1  H x W
 
परिणामी पोलिसांना समर्थकांवर सौम्य लाठीमार करावा लागला. हंगेरीचे समर्थक व पोलिसांदरम्यान संघर्ष झाला. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला. सामन्याच्या 24 व्या मिनिटाला रोलॅण्ड सल्लाईने पेनॉल्टीवर गोल नोंदवून हंगेरीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तत्पूर्वी लॉकी निगोचा गोल इंग्लंडच्या लुक शॉने रोखला. 37 व्या मिनिटाला इंग्लंडने सामन्यात बरोबरीत साधली. फिल फोडेन, टायरॉन मिंग्स व जॉन स्टोन्सने सुरेख समन्वय साधत हा गोल नोंदविला. सामन्याच्या अखेरीस इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने गोल नोंदविण्याचा कसोशीने प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.