सुरू होणार राज्यातील महाविद्यालये...'या' विद्यार्थ्यांनाच प्रवेश, वाचा नियमावली

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई,
राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील नियमावली कॉलेज सुरु करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू केले जाणार आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा (Colleges and schools closed) संपूर्णपणे बंद होते. शाळांनंतर आता येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
 
  
samant_1  H x W
 
लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्याना कॉलजेमध्ये येणं शक्य होत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाची नियमावली पळून वसतिगृह सुरु करण्यात येतील. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांनी कोरोनचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालयं सुरु करायची आहेत. लोकल सुरु होणार का? मुंबईतील कॉलेजेस सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी लोकलची गरज असणार आहे. अशा परिस्थिती कॉलेज सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी लोकलची सेवा सुरु करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवदेन सादर केलं जाणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
 
 
त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यवस्था
“ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणं शक्य होणार नाही त्यांची कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करुन द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड 19 ची लस घेतली नाही त्यांच्याकरता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून विशेष लसीकरण मोहिम राबवावी, अशा सूचना आम्ही जीआरमध्ये नमूद केला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
वसतीगृह देखील टप्प्याटप्प्याने सुरु होणार
“वसतीगृहांच्या संदर्भात देखील मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. टप्प्याटप्प्याने वसतीगृह उघडण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण ही सुरु करत असताना मुंबई उच्च शिक्षण संचालक आणि पुण्याचे उच्च शिक्षण संचालकांनी यांनी पूर्ण वसतीगृहांचा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतरच वसतीगृह सुरु करायचे आहेत”, अशी सूचना उदय सामंत यांनी केली. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आऊटसोअर केलेला स्टाफ जो विद्यालयात काम करतो त्यांचं शंभर टक्के लसीकरण करुन घेण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी केला पाहिजे, अशीही सूचना त्यांनी केली.