हत्या प्रकरणी द्रमुकच्या खासदाराला पोलिस कोठडी

    दिनांक :13-Oct-2021
|

natre _1  H x W
 
 
चेन्नई, 
हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले द्रमुकचे खासदार टीआरव्हीएस रमेश यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कुड्डालोर न्यायालयाने आज बुधवारी दिला. रमेश हे कुड्डालोर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते सोमवारी न्यायालयाला शरण गेले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. प्रभाकरन् यांनी रमेश यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. रमेश यांच्या मालकीच्या येथील काजूच्या प्रकल्पातील एका कर्मचार्‍याच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.