माजी पंतप्रधान मनमोहनसिंग अत्यवस्थ

    दिनांक :13-Oct-2021
|

natre _1  H x W
 
नवी दिल्ली, 
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्समधील कार्डियो टॉवरमध्ये डॉ. नितीश नायक आणि त्यांच्या चमूच्या निरीक्षणाखाली मनमोहनसिंग यांना ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांना नेमके काय झाले, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मनमोहनसिंग यांना ताप आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले. सोमवारी त्यांना ताप आला होता आणि बुधवारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.