गिरिजा ओकचे ग्लॅमर्स फोटो

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई,
मालिका-चित्रपट आणि रंगभूमी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे 'गिरिजा ओक-गोडबोले'. सौंदर्याबरोबरच आपल्या अभिनयाच्या बळावर गिरिजा ओकने चित्रपट सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' आणि 'शोर इन द सिटी' या चित्रपटातून गिरिजाच्या हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या भूमिका आहेत. त्यानंतर गिरीजा गुलमोहर, हाऊसफुल, लज्जा इत्यादीसह इतर अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सुंदर साडीतील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या साडीत गिरिजाच्या सौंदर्याला चार चांद लागले असून, ती अतिशय मादक दिसत आहे.

girija_1  H x W 
 
गिरिजा वयाच्या 15 व्या वर्षापासून अभिनयाच्या क्षेत्रात असून तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. गिरिजा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या आहे. गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही ग्लॅमर्स फोटो शेअर करत असते. नुकतंच गिरिजा ओकनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर अक्षरशः कमेंटचा वर्षाव केला आहे. काळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत तिनं हे फोटोशूट केलं आहे.