शेतात जाऊन मारहाण : सातजणांवर गुन्हा दाखल

- गोसावी कुटुंबावर तीनवेळा जीवघेणा हल्ला

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा 
हदगाव,  
शिवशंकर औकारगिर गिरी यांची वडिलोपार्जित जमीन सर्वे नं. 103 ही हडसणी शिवारात असून त्यांचा उदरनिर्वाह त्याच जमिनीवर आहे. परंतु हदगाव तालुक्यातील हडसणी येथील काही धनाढ्य लोकांचा डोळा जमिनीवर असल्याने गोसावी समाजाचे एकच कुटुंब असल्यामुळे 2008 पासून त्यांच्यावर आघात होताना दिसून येतो.
 
 
gosavi_1  H x W
 
 
 
या प्रकरणी आजपर्यंत शिवशंकर गिरी यांनी 3 हजारांपेक्षा जास्त अर्ज महसूल कार्यालयात दिले आहेत. याही उपरांत 7 व्यक्तींनी मिळून शिवशंकर यांच्यावर हल्ला केल्याने ते मृत्युशी झुंज देत आहेत. त्यांच्या तक‘ारीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही गिरी यांची 8.30 हेक्टर वडिलोपार्जित जमीन असून त्यावर हडसणी शिवारामध्ये ते बागायती करतात. सातबारावर 1960 पासून पणजोबा, आजोबा, तर 1991 पासून स्वत: शिवशंकर गिरी यांचे नाव आहे.
 
 
 
मंगळवार, 12 ऑक्टोबरला सकाळी 10 च्या सुमारास शिवशंकर गिरी हे शेतात काम करत असताना संभाजी, कैलास, माधव, शेषराव, तुकाराम, राजू व गणेश या सर्व सूर्यवंशींनी संगनमत करून जातीय शिवीगाळ करून लाकडाने व थापड बुक्क्याने मारहाण करून खत्म करून टाकण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या राहूल गिरी यांनादेखील मारहाण केली.
 
 
 
शिवशंकर गिरी यांच्यावर दुसर्‍या वेळी हा प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्या कुटुंबातील राहूल गिरी यांच्यावर चाकूने हल्ला, तर त्याच कुटुंबातील एका महिलेची छेडछाड केली आहे. या प्रकरणात हदगाव पोलिस ठाणे, तसेच तहसील कार्यालयातून 107 च्या अनुषंगाने आपआपसात भांडणे करू नका म्हणून पायबंद केलेले आहे. परंतु तक‘ारदाराकडून कायद्याचे पालन होत असताना आरोपींकडून मात्र वेळोवळी कायदा पायदळी तुडविला जात आहे, हे उल्लेखनीय.