हिमा दासच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक

    दिनांक :13-Oct-2021
|
पतियाळा, 
भारताची अव्वल धावपटू हिमा दास आपले प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी पतियाळामध्ये आली. प्रशिक्षण सरु करण्यापूर्वी तिची कोरोना चाचणी घेण्यात आली, मात्र तिच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यानंतर हिमा दासने पायाच्या दुखापतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडी विश्रांती घेतली होती.
 
sportt _1  H x
 
2018 सालची 20 वर्षांखालील 400 मीटर शर्यतीची विश्वविजेती हिमा 10 ऑक्टोबर रोजी पतियाळामध्ये परतली. 8 व 9 रोजी ती गुवाहाटीमध्ये होती. तिला केवळ सौम्य थकवा होता. आम्हाला वाटले की काळजी करण्यासारखे काही नाही. पतियाळा येथे अनिवार्य चाचण्या दरम्यान तिच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला, असे एका स्थानिक प्रशिक्षकाने सांगितले. मात्र हिमाच्या माध्यम व्यवस्थापकाने सांगितले की, काळजी करण्यासारखे काहीच नाही. राष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स शिबिर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे.