भारतीय संघाची नवीन जर्सी सादर

    दिनांक :13-Oct-2021
|
नवी दिल्ली,
टी-20 विश्वचषक कि‘केट स्पर्धा सुरू होण्याला काही दिवस शिल्लक असताना भारतीय क्रिकेट संघाला नवीन जर्सी मिळाली आहे. विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ गडद निळ्या रंगाची जर्सी परिधान करेल पण त्यावर दिलेला हलका निळा स्पर्श त्याला पूर्णपणे नवीन अनुभूती देत आहे .
 
sport _1  H x W
 
बीसीसीआयने आपल्या 5 दिग्गज खेळाडूंसह या नवीन जर्सीचे सादरीकरण केले आहे व हे चित्र अधिकृत ट्विटर हॅण्डलवर सामायिक केले. त्याखाली लिहिले, सादर करीत आहे बिलियन चीयर्स जर्सी. या जर्सीच्या पॅटर्नला संघाच्या लाखो चाहत्यांनी पसंतीची पावती दिली आहे. या नवीन जर्सीत विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आगामी 17 ऑक्टोबरपासन आयसीसी टी-20 विश्वचषक कि‘केट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानशी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 
 
भारतीय संघाचे सामने
24 ऑक्टोबर, सायं. 7.30 वा., दुबई येथे भारत वि. पाकिस्तान
31 ऑक्टोबर, सायं. 7.30 वा., दुबई येथे - भारत वि. न्यूझीलंड
3 नोव्हेंबर, सायं. 7.30 वा., अबुधाबी- भारत वि. अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर, सायं. 7.30 वा., दुबई येथे- भारत वि. बी-1
8 नोव्हेंबर, सायं. 7.30 वा. दुबई येथे- भारत वि. ए-2
10 नोव्हेंबर, सायं. 7.30 वा., अबू धाबी येथे- पहिला उपांत्य सामना
10 नोव्हेंबर, सायं. 7.30 वा., दुबई येथे- दुसरा उपांत्य सामना
14 नोव्हेंबर, सायं. 7.30 वा., दुबई येथे- अंतिम सामना
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक‘वर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर