अरे देवा...पुन्हा नव्या बुरशीची एन्ट्री

राज्यात आढळले रुग्ण...

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई,
कोविडवर मात करुन पूर्ण बरे झालेल्यामध्ये पुन्हा नवा आजार आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे राज्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. कोविडमुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये आता नवीन बुरशी (fungus) आढळून आली आहे. गेल्या तीन महिन्यांत अशा प्रकारचे चार रुग्ण आढळून आले आहेत ज्यांच्यात एक वेगळीच बुरशी आढळून आली आहे. आता या नव्या बुरशीमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.  या रुग्णांना महिन्यानंतर सौम्य ताप आला. तसेच त्यांच्या पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्याच्या तक्रारी आल्या. सुरुवातीला या रुग्णांना स्नायू दुखी बरे होण्यावर औषधे देण्यात आली. डॉक्टरांनी सांगितले की, तीन महिन्यात अशा प्रकारचे चार रुग्ण आढळले आहेत. या चार रुग्णांमध्ये एस्परगिलस बुरशीजन्य ऑस्टियोमायलाईटिसचे निदान झाले आहे. यापूर्वी भारतातील कोविडमुक्त झालेल्या रुग्णांमध्ये अशा प्रकारचा कुठलाही आजार नोंदवला गेला नव्हता.
 
 
abj _1  H x W:
दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाचे संसर्गजन्य रोग तज्ञ परिक्षित प्रयाग यांच्या सांगण्यानुसार, वैद्यकीय भाषेत या आजाराला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस असे म्हणतात. या बुरशीजन्य संसर्गाचे निदान खरणे खूप कठीण आहे. कारण हे पाठीच्य कण्यातील पोकळीत आढळून येतो. या प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडात आढळतो. फुप्फुसातही बुरशी सापडण्याचे हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे. या रुग्णाला जेव्हा औषधांच्या उपचाराचा गुण आला नाही तेव्हा त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. एमआरआय स्कॅनमध्ये स्पॉन्डिलोडायसिटिस (spondylodiscitis) आजाराचे संक्रमण झाल्याचं दिसून आलं. यामुळे रुग्णाच्या हाडांवर परिणाम झाल्याचं समोर आलं. तज्ज्ञांनी सांगितले की, याला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस असे म्हटलं जातं.