गांधीजींच्या सूचनेनुसार सावरकरांनी केली होती दया याचिका

राजनाथसिंह यांची माहिती

    दिनांक :13-Oct-2021
|
नवी दिल्ली, 
महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान तुरुंगात असताना ब्रिटिशांकडे दया याचिका केली होती. अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. ‘वीर सावरकर : द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजनाथसिंह बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे सुद्धा उपस्थित होते.
 
natre _1  H x W
 
राजनाथसिंह म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेळोवेळी खोटे पसरविण्यात आले. वेळोवेळी असे सांगण्यात आले की, तुरुंगातून मुक्त होण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे दया याचिका केली, पण महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून अंदमान तुरुंगात असताना सावरकरांनी दया याचिका केली होती. सावरकरांना बदनाम करण्याचा नेहमीच प्रयत्न झाला. सावरकर एक महान स्वातंत्र्यसैनिक, महान नायक होते आणि भविष्यातही राहतील. सावरकरांसाठी हिंदू हा शब्द धर्माशी नाही तर संस्कृतीशी संबंधित होता. वीर सावरकरांचा द्वेष स्वीकारला जाऊ शकत नाही. 2003 मध्ये संसदेत वीर सावरकरांचे छायाचित्र लावण्यास राजकीय पक्षांनी विरोध केला होता. या पक्षांचे नेते त्या कार्यक‘माला आले नाहीत, तुम्ही असा द्वेष का करता, असा सवालही राजनाथसिंह यांनी उपस्थित केला.
 
सावरकरांविषयीचे वाद चुकीचे : फडणवीस
सावरकरांनी कारागृहात खर्‍या काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्याबद्दल वाद चुकीचे असल्याचे माजी मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस दोन दिवसांच्या गोव्याच्या दौर्‍यावर आहेत. फडणवीस म्हणाले, सावरकरांनी त्या काळात अनेकांच्या याचिका तयार केल्या होत्या, पण स्वत: याचिका केली नव्हती. त्यांना आग‘ह झालाण त्यावेळी त्यांनी दया याचिका केली. हा इतिहासाचा भाग आहे.
 
सावरकरांना ‘खलनायक’ म्हणणारे उघडे पडले : नकवी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित मुद्दे अनेक कथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी आपल्या पद्धतीने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. मुळात सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या सुरचनेसाठी जे काही केले, ते उल्लेखनीय आहे. त्यांनी मुस्लिम समुदायालाही आपल्यापैकीच एक मानले. त्यांना तुष्टीकरण करणारे म्हणणार्‍या आणि ‘खलनायक’ ठरवू पाहणार्‍या कथित सेक्युलरांचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका भाजपा नेते मु‘तार÷अब्बास नकवी यांनी केली.
 
 
‘ते’ सावरकरांना राष्ट्रपिता करतील : ओवेसी
राजनाथसिंह यांच्या विधानावर एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांनी टीका केली. भाजपकडून इतिहासाची मोडतोड केली जात आहे. हे असेच सुरू राहिले तर ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप आहे आणि न्या. जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत ज्यांच्या नावाचा समावेश होता, त्या सावरकरांना हे लोक राष्ट्रपिता म्हणून जाहीर करतील, असे ओवैसी यांनी सांगितले.