रक्षाबंधन चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित

    दिनांक :13-Oct-2021
|
 raksha_1  H x W
 
 
मुंबई,
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपट रक्षाबंधनचे चित्रीकरण पूर्ण केले असून, भूमी पेडणेकर अभिनीत हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षयने समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत पूर्ण झाले. अक्षयने आनंद एल. रायसोबत एक फोटोही शेअर केला. आनंद राय दिग्दर्शित, हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित या चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्याने कलर यलो प्रॉडक्शन, झी स्टुडिओ आणि अलका हिरानंदानी यांनी केली आहे. तर अक्षयसोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मु‘य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.