शेफाली वर्मा दुसर्‍या स्थानावर

    दिनांक :13-Oct-2021
|
दुबई, 
आयसीसीच्या महिलांच्या टी-20 क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिची एका स्थानाने घसरण झाली असून, ती दुसर्‍या क्रमांकावर आहे. स्मृती मंधानाने मात्र आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.
 
sport _1  H x W
 
शेफालीचे 726 गुण व स्मृतीचे 709 गुण आहेत. क‘मवारीत ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसून आले असून, बेथ मूनी 754 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. कर्णधार मेग लॅनिंग चौथ्या व एलिसा हिली सहाव्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन व सुझी बेट्स अनुक‘मे पाचव्या व सातव्या स्थानांवर आहेत. गोलंदाजांमध्ये इंग्लंडची सोफी ईक्लेस्टन प्रथम स्थानावर असून, भारताच्या राजेश्वरी गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एकूण 5 बळी मिळवित 12 वे स्थान प्राप्त केले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सोफी डिव्हाइन अव्वल स्थानावर आहे.