जागतिक बँक, नाणेनिधीत तातडीने सुधारणा व्हावी

निर्मला सीतारामन् यांची भूमिका

    दिनांक :13-Oct-2021
|
बोस्टन,
कित्येक दशकांपासून ज्यांचे मुद्दे दुर्लक्षित आहेत, त्या देशांबाबत संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासार‘या संघटना काहीच बोलत नाहीत. त्यामुळे या संघटनांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी येथे व्यक्त केली.
 
intre _1  H x W
 
या सर्व संघटनांनी स्वतःत सुधारणा घडवून आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी येथील हॉवर्ड केनेडी शाळेत सांगितले. काही देशांतील सुधारणा या वेगवेगळ्या टप्प्यांत आहेत. मागील काही दशकांतील मार्गावरच या जागतिक संघटना अद्याप चालत आहेत, असे त्यांनी मोसावर-रहमानी सेंटर फॉर बिझनेस अ‍ॅण्ड गव्हर्न्मेटने हॉवर्ड विद्यापीठात प्राध्यपकांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात सांगितले.
 
 
ज्या देशांचे मुद्दे कित्येक दशकांपासून सुटलेले नाहीत, त्यांच्याबाबत या संघटना काहीच बोलत नाहीत. हा मुद्या व्यापार, सुरक्षा, नाणेनिधीच्या चौकटीचा असो, अथवा निधी वितरणाच्या विकासाबाबत असो, या संघटना बोलत नाही, असे त्यांनी सांगितले. या संघटनांनी आता स्वतःमध्ये बदल करून अधिक पारदर्शक होण्याची गरज आहे. पुरेसे प्रतिनिधित्व न मिळालेल्या देशांसाठी या संघटनांनी बोलणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे हे सर्व तातडीने घडून आले पाहिजे, असे मला वाटत असल्याचे सीतारामन् यांनी सांगितले. या संघटनांनी अधिकाधिक प्रतिनिधित्व दिल्यास संसाधनांचे समसमान वितरण होईल, असे सीतारामन् यांनी सांगितले.
 
कोळसा संकटाचे वृत्त आधारहीन
देशात कोळशाचा तुटवडा होऊन संकट निर्माण झाल्याचे वृत्त आधारहीन असल्याचे स्पष्ट करीत, भारतात गरजेपेक्षा जास्त विजेची निर्मिती होत असल्याचे सीतारामन् यांनी सांगितले. कोळशाचा तुटवडा असल्याचे, इतर वस्तूंची कमतरता असल्याने ऊर्जेच्या पुरवढा आणि मागणीच्या परिस्थितीत अचानक अंतर पडल्याचे वृत्त तथ्यहीन असल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी मला दोन दिवसांपूर्वी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.