453 अंकांच्या कमाईसह निर्देशांक नव्या उंचीवर

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई, 
भांडवली बाजारातील तेजीचे सत्र आज बुधवारी देखील कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 452.74 अंकांच्या कमाईसह 60,7373.05 या नव्या उंचीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 169.80 अंकांसह 18,161.75 वर स्थिरावला.
 
maha _1  H x W:
 
दिवसभराच्या व्यवहारादरम्यान निफ्टीने 18,197.80 ही विक‘मी उंची गाठली होती. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीला आजच्या सत्रात सर्वाधिक फायदा झाला. त्यापाठोपाठ पॉवरग्रिड, आयटीसी, एल अ‍ॅण्ड टी, टेक महिंद्रा, टायटन आणि टाटा स्टील या कंपन्यांना फायदा झाला. दुसरीकडे मारुती, एचयूएल, नेस्ले इंडिया, अ‍ॅक्सिस बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या समभागांवर विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने यात घसरण झाली.