विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर

- शरद पवार यांचा दावा

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई, 
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआय, ईडी आणि एनसीबीसार‘या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बुधवारी केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांची बदनामी करण्याची काळजी घेतली जात आहे, असे पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून सातत्याने सीबीआय, आयकर विभाग, ईडी आणि एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. राजकीय कारणांसाठी या सर्वच तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.
 
maha6_1  H x W:
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. आयकर विभागाची छापेमारी सलग सहाव्या दिवशी बुधवारीदेखील सुरू आहे, असे पवार यांनी आयकर विभागाच्या कारवाईकडे लक्ष वेधताना सांगितले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, काही केंद्रीय तपास यंत्रणांनी ठेवलेल्या विविध आरोपांचा अनिल देशमुख हे सामना करीत आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परवमीरसिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
 
 
ज्याने आरोप केले, ते परमबीरसिंह बेपत्ता आहेत. मात्र, एका जबाबदार अधिकार्‍याने जबाबदार मंत्र्याविरोधात आरोप करण्यासारखे प्रकार यापूर्वी झाले नव्हते, पण त्यांनी केलेल्या आरोपांनंतर देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र, परमबीरसिंह फरार झाले. हा एक मोठा फरक आहे, असे अनिल देशमुख यांचा बचाव करताना त्यांनी सांगितले.