राष्ट्रीय विज्ञान अकादमीत दोन मराठी शास्त्रज्ञ मानद सदस्य

    दिनांक :13-Oct-2021
|
पुणे,
दिल्ली येथील प्रतिष्ठित भारतीय विज्ञान अकादमीतर्फे (इन्सा) दोन मराठी शास्त्रज्ञांना मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे प्रा. संजीव धुरंधर तसेच मूळचे जळगावचे आणि सध्या भोपाळ येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेतील रसायनशास्त्राचे प्रा. नितीन तुकाराम पाटील यांची अकादमीने फेलो म्हणून निवड केली आहे.
 
maha _1  H x W:
 
इन्साचे फेलो झाल्यामुळे या दोन शास्त्रज्ञांना देशातील वैज्ञानिक ध्येय धोरणे निश्चित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येणार आहे. संजीव धुरंधर हे भारतातील गुरुत्वीय लहरी संशोधनाचे प्रणेते आहेत आणि त्यांनी योगदान दिले आहे. तसेच प्रा. पाटील यांनी सुवर्ण उत्प्रेरित कार्बोफिलिक सकि‘यता आणि क‘ॉस कपलिंगसंदर्भातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.