दक्षिणेची वैष्णवदेवी माता महाकाली

- नवरात्रात भक्तांची मांदियाळी

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा,  
माता महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या केवळ दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. अमावस्या आणि पौर्णिमेची पूजा करणार्‍या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माता महाकाली, महालक्ष्मी महासरस्वती यांना माता रुक्मणीप्रमाणे प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याचे आदेश द्यावे आणि तेव्हापासून जे भक्त पौर्णिमा-अमावस्येला येथे येतात आणि आईची सेवा करतात. आई त्यांची इच्छा पूर्ण करते. हे त्याचे पौराणिक महत्त्व आहे.
 
 
vaishnavdevi_1  
 
 
 
ही जागा आदिवासी महिलांनी शोधून काढली आणि बाबा कुमरे यांनी आयुष्यभर आईची सेवा केली. महाकाली प्रकल्पाच्या उभारणीनंतर माता महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे मंदिर धाम धरणाच्या पाण्यात बुडाले होते. आईने आपल्याला स्वप्नात येऊन डोहवाले बाबाच्या मंदिराजवळील महाकाली मंदिर पुन्हा बांधण्याचे आदेश दिल्याचे पं. शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले. महाकाळी येथे प्रत्येक अमावास्येच्या दिवशी माता महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा अष्टांग योगासह केली जाते. जे नियमितपणे पंढरवाडीत येतात आणि त्यांची पूजा करतात, त्यांची सर्व दुःख दूर होतात, असे अग्निहोत्री सांगितले.
 
 
 
वर्धा जिल्ह्यात निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराला शासनाने क दर्जा दिला असला तरी त्याचा या तिर्थक्षेत्राचा आवश्यक तो विकास झालेला नाही. मंदिराच्या पवित्र कार्यात राजकारणाचा प्रभाव वाढल्याने शासनाचे या परिसराकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, आई महाकालीच्या आशीर्वादाने आपण या परिसरातील सोयी सुविधा उपलब्ध करून देत असताना त्यातही शासनाकडून अनेकदा अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो. येथे शारदीय व चैत्र नवरात्रात वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर अर्ध्या विदर्भात माता भक्त दर्शनासाठी येतात. तसेच दर महिन्यातील अमावस्या आणि पौर्णिमेलाही हजारो भक्त येतात. बाराही महिने महाकाली मंदिरात भक्तांची गर्दी असते. माता महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मीचा अनेकांना अनुभव आलेला आहे. माजी राज्यपाल किरण बेदी यांच्यासह अनेकांनी येथे भेट दिली.
 
 
 
पुरातन महाकाळी मंदिर धरणात गेल्यानंतर देवीने आपल्या स्वप्नात येऊन मंदिर बांधण्याची सूचना केली. आपण यथाशक्ती महाकालीची भक्ती करतो. या ठिकाणी भव्य धर्मशाळा बाधण्याात आली आहे. पंधरवाडीनिमित्त होणार्‍या महाप्रसादाला हजारो भक्त प्रसाद घेतात. येथे अखंड ज्योतीचेही फार महत्त्व आहे. शासनाने तिर्थक्षेत्राचा विकास करावा, अशी अपेक्षाही पं. अग्निहोत्री यांनी व्यक्त केली.